मुंबई: साउथस्टार पूजा हेगडे ही सध्या सलमान खानसोबत किसी का भाई किसी जान या चित्रपटात दिसणार आहे. ती या चित्रपटामुळे भलतीच चर्चेतही आली आहे. सध्या ती आणि सर्व टिम या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.नुकतच त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्येही हजेरी लावली होती. दरम्यान पुजा हेगडे आणि सलमान खान हे दोघ डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या सर्व केवळ अफवा असल्याचा खुलासा पुजानं एका मुलाखतीत केला.
पुजानं नुकतिच एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली यामध्ये तिने तिच्या आणि सलमान खानच्या अफेअरच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली.या बातमीत कितपत तथ्य आहे, असे विचारल्यावर ती म्हणाली, 'आता मी काय बोलू. मी ही माझ्याबद्दलच्या या बातम्या वाचल्या आहेत. पण तसं काही नाही. मी सिंगल आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. सध्या मी पूर्णपणे माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. मला एका शहरातून दुसऱ्या शहरात काम करायचे आहे. अशा अफवांवर मी काहीही बोलणार नाही. कारण ते केवळ बिनबूडाच्या अफवा आहेत.'
त्याचबरोबर पूजाने सलमान खानसोबत चित्रपटात काम करण्याचा अनुभवही शेअर केला. लॉकडाऊनपूर्वी हा चित्रपट तिला ऑफर करण्यात आला होता. तेव्हा त्याचे टायटल वेगळ होतं. साजिद नाडियादवाला देखील या चित्रपटाचा एक भाग होते. मी यापूर्वीही त्याच्यासोबत काम केले आहे.पूजा पुढे म्हणाली, '2016 मध्ये माझ्या 'मोहनजोदड़ो' चित्रपटातील माझे काम पाहून सलमान सरांनी सांगितले होतं की, आपण लवकरच एकत्र काम करूया.
या चित्रपटाची ऑफर मिळताच मी स्वत:ला रोखू शकली नाही. या चित्रपटात मी जी व्यक्तिरेखा साकारत आहे ती माझ्यासाठी खूप चांगली आहे.या चित्रपटात मी तेलुगू मुलीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे ही भुमिका साकारणं माझ्यासाठी थोडं सोपं होतं.'या चित्रपटात पूजा हेगडे पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसणार आहे. याशिवाय व्यंकटेश दग्गुबती, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, राघव जुयाल आणि विनाली भटनागर हे कलाकारही दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट 21 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.