मुंबई: आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नाच्या अफवांदरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या रिंग फिंगरमध्ये सिल्व्हर बँड घातलेली दिसली. राजकारणी राघव चढ्ढा यांना डेट करत असल्यामुळे ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे.सोमवारी रात्री परिणीतीच्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत आहे. तिच्या हातातील अंगठी पाहून त्यांनी एंगेजमेंट केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अभिनेत्री सोमवारी रात्री सेलिब्रिटी मॅनेजर पूनम दमानिया यांच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली होती. यादरम्यान परिणीतीने जीन्स आणि क्रॉप टॉप घातला होता. परिणीती कॅज्युअल लूकमध्ये खूपच आकर्षक दिसत होती.ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्माईलही दिली.दुसरीकडे, राघव चड्ढा यांनी पत्रकारांशी नुकत्याच झालेल्या भेटीत आपल्या रुमर्ड वेडिंगवरील प्रश्न चतुराईने टाळले. मात्र, अलीकडेच गायक-अभिनेता हार्डी संधूने परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याला दुजोरा दिला होता. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.