मुंबईत २७ एप्रिलपासून राज्य कबड्डी स्पर्धा

मुंबई : बजरंग क्रीडा मंडळ अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुरुष स्थानिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा २७ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथील संकुलात पार पडणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील २१ निमंत्रित पुरुष संघांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत अडीच लाखांपेक्षा अधिक रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.स्पर्धेत अंतिम विजयी होणाऱ्या संघास आकर्षक सुवर्णचषक व रोख रुपये पंचाहत्तर हजार, तर उपविजयी संघास चषक व रोख रुपये एकावन्न हजार बक्षिसाच्या रूपात प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेकरिता सुनील शिंदे (अध्यक्ष), शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सीताराम साळुंके (८८५०६४७०९८), कार्याध्यक्ष रमाकांत इंदप (९९३०३२६१३१) यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. अधिक माहितीकरिता सीताराम साळुंके, कार्याध्यक्ष रमाकांत इंदप यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने