मातोश्रीवर मुख्यमंत्री शिंदे रडले? संतोष बांगर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

मुंबई: उद्धव ठाकरे गाटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबच एका मुलाखतीमध्ये बोलताना मोठा गोप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोरी करण्याआधी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’वर आले होते. तसेच मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बांगर म्हणाले की...

आदित्य ठाकरे यांच्या या गोप्यस्फोटावर बोलातना शिंदे गटाचे आमदार बांगर म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातले आमदार यांनी केलेल्या उठावामागे एकच कारण होतं ते म्हणजे आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत बसायचं नाही. ज्या लोकांचे थेट दाऊद, पाकिस्तान्यांशी संबंध असलेल्या लोकांसोबत बसायला लावण्याचं काम या लोकांनी केलं गेलं होतं.बांगर पुढे म्हणाले की, सर्व आमदारांनी सांगितलं होतं एकनाथ भाई तुम्ही उठाव करा आम्ही तुमच्या १०० टक्के पाठीमागं आहोत. भाजपनं धमकी दिली नाही आदित्य ठाकरे खोटं बोलत आहेत असेही बांगर म्हणाल आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

काल राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह आदित्य ठाकरे हे हैदराबाद विद्यापीठात एका दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याचे भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला.भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने