मुंडे बंधुभगिनी व्यासपीठावर एकत्र अन् पंकजांच्या कारखान्यावर GST विभागाचा छापा

परळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. आज सकाळी १० वाजता GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे.केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात येतो. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.असल्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता लगेच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.तर पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावरील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.

धनंजय व माझ्यात भांडण लावले : पंकजा मुंडे

दोन दिवसांपूर्वी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या “धनंजय व माझ्यात काहींनी भांडण लावले. ते कशासाठी, हे माहीत नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. मी खूप गरीब आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचे सांगितलेले दिसत आहे. आमच्यात लढाया लावणाऱ्यांना काय साध्य करायचे आहे, ते मला माहीत नाही.”


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने