सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, मग सूर्यग्रहणाचे नियम पाळावे की नाही?

दिल्ली: अमावास्या अर्थात गुरुवारी दि.20 एप्रिल 2023 या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून ते भारतात दृश्यमान होणार नाही. हे ग्रहण इंडोनेशिया, फिलिपिन्स, पश्चिम ऑस्ट्रेलिया या प्रदेशात दृश्यमान होणार आहे.

ग्रहण दिसणाऱ्या भारताबाहेरील काही प्रमुख शहरांच्या स्पर्श व मोक्ष वेळा पुढीलप्रमाणे-

सिडनी स्पर्श-13:37 AEST, मोक्ष-15:18 AEST

मेलबर्न स्पर्श- 13:15 AEST, मोक्ष- 15:01 AEST

ब्रिस्बेन स्पर्श- 13:43 AEST, मोक्ष- 15:42 AEST

पर्थ स्पर्श- 10:00 AWST, मोक्ष- 12:46 AWST

जकार्ता(इंडोनेशिया) स्पर्श- 09:29 WIB, मोक्ष- 12:06 WIBसूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, मग सूर्यग्रहणाचे नियम पाळावे की नाही?

भारतीय प्रमाणवेळेनुसार या ग्रहणाचा स्पर्श 20 एप्रिल 2023 च्या सकाळी 07:04 वाजता असून ग्रहणमोक्ष दुपारी 12:19 वाजता आहे.भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम भारतातील लोकांनी पाळू नयेत तसेच या ग्रहणाचे नैसर्गिक व राशी इत्यादीनुसार होणारे परिणाम ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशात विचारात घेऊ नयेत.तसेच ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशातील व भारतातील गर्भवती स्त्रियांनी देखील या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने