राजकारणात खळबळ करण्याची क्षमता असणाऱ्या दोन युवराजांची भेट, भावी युतीची नांदी?

मुंबई: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज (११ एप्रिल) तेलंगानाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आदित्य ठाकरे तेलंगानाचे नेते के टी रामाराव यांची भेट घेतली. के टी आर हे तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सुपुत्र आहेत तसेच तेलंगना मंत्रिमंडळातील अनेक महत्वाची खाती ही त्यांच्याकडे आहेत .उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांची पक्षाने साथ सोडली . यानंतर आदित्य ठाकरे या मागील बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्याचं काम आदित्य ठाकरे यांच्या कडून केलं जात आहे.महाराष्ट्राप्रमाणे देशात देखील मजबूत मित्र पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावा या उद्देशाने आदित्य ठाकरे हे तेलंगना दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली होती. तसेच आगामी काळात ते अखिलेश यादव यांच्यासोबत देखील त्यांची भेट नियोजित आहे.अगामी वर्ष निवडणूकांचं..

आगामी वर्ष हे निवडणूकांचं वर्ष असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काळात महाराष्ट्रात महानगरपालिका तसेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत त्यामुळे येत्या काळात राजकीय समीकरणे जुळवून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून भक्कम आघाडीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच तेलंगना दौऱ्यादरम्यान गीतम विद्यापीठातर्फे युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

बीसीआर आणि महाराष्ट्र

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. मागील २-३ महिन्यात त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक छोट्या मोठ्या सभा घेतल्या पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी काम करत आहेत.के.चंद्रशेखर राव हे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणार प्रवेश करण्याची संधी शोधत आहेत. त्यांनी राज्यात २-३ जाहीर सभा घेतल्या आहेत. सोबतच पक्ष वाढीसाठी मोठ मोठे नेते BRS पक्षात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमिवर आदित्य ठाकरे यांचा तेलंगना दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने