शाहरुख पुन्हा ठरला 'बादशाह'! लियोनेल मेसी-मार्क जुकरबर्ग यांना मागे टाकत बनवला नवा रेकॉर्ड

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह म्हणुन ओळख असलेला सुपरस्टार शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पठाण या चित्रपटामुळे तो जरा जास्तच चर्चेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेक रेकॉर्ड बनवले आणि पठाण भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. पुन्हा शाहरुख बॉलिवूडचा बादशाह केला.शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर राज्य करत आहे . त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले.शाहरुखच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.आजच्या काळात त्यांचं नाव केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. शाहरुख खान हा जगभरात करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो यात काही वाद नाही याचा पुरावाही तो वेळोवेळी दितो.आता शाहरुख खाननं पुन्हा त्याची लोकप्रियता सिद्ध केली आहे. त्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. खरं तर, टाईम मासिकने 2023 सालासाठी जगभरातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. टाईम मासिकच्या या यादित शाहरुख खानचं नावं हे अग्रस्थानी आहे.टाइम मॅगझिनच्या वाचकांच्या सर्वेक्षणात शाहरुख खानला सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व त्याची निवडण्यात आले आहे. 2023 टाइम 100 पोलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या किंग खानला 4% मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर बुरखा आणि हिजाबच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या इराणी महिलांचा गट आहे.

Time.com नुसार, 2023 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी या महिन्याच्या 13 तारखेला प्रसिद्ध होईल. 2022 मध्ये या यादीत गौतम अडाणी, करुणा नंदी आणि खुर्रम परवेज यांसारख्या सेलिब्रिटींची नावे समाविष्ट करण्यात आली होती.दरवर्षी मासिकाच्या वतीने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यासाठी वाचकांकडून मतदान केले जाते. त्याच वेळी, यावेळी 12 लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले, त्यापैकी शाहरुखला 4 टक्के मते मिळाली आणि त्याचे नाव या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.मार्क झुकेरबर्ग, लिओनेल मेस्सी, अभिनेत्री मिशेल योह, टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा ही सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या मतदानाच्या शर्यतीत इतर अनेक मोठी नावे होती. मात्र वाचकांनी शाहरुखला सर्वात प्रभावशाली मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने