महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर अखेर अमित शहांचं ट्विट आलं; म्हणाले, मला...

मुंबई: नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक एकत्र आले होते. मात्र उष्माघातामुळे 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच रुग्णालयात श्रीच्या सेवेकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. या कार्यक्रमाला केंद्री गृहमंत्री अमित शहा देखील पोहोचले होते. या घटनेवर आज त्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.अमित शहा ट्विट करून म्हणाले की, काल झालेल्या महाराष्ट्र षण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.खारघर इथं आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी २० लाखांहूनही अधिक गर्दी जमली होती. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे या सोहळ्यातल्या १२ नागरिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवरन संताप व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने