छत्रपती शिवाजी महाराजांची ऊंची किती? अप्पीचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल..

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज हा कायमच आपल्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. महाराज आहोत म्हणून आपण आहोत याची जणीउव प्रत्येक मराठी माणसाला आहे, त्यामुळे महाराजांचा पोवाडा असो किंवा त्यावर आलेला सिनेमाम त्यावर भरभरून प्रेम केलं जातं.नुकतंच छोट्या पडद्यावरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत महाराजांच्या ऊंची संदर्भात एक प्रश्न विचारला गेला. त्यावर मालिकेतील नायिकेनं जे उत्तर दिलंय तो सध्या चर्चेचा विषय झाला आहे. हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

झाले असे की, '' अप्पी आमची कलेक्टर.. या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. आप्पी तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणार असून नुकतीच ती परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती मुलाखतीला जाते. जिथे अनेक दिग्गज बसलेले असतात. या विशेष भागात ज्येष्ठ वकील उज्वल निकम आणि लेखक विश्वास पाटील देखील सहभागी झाले होते.यावेळी अप्पीची मुलाखत घेताना तिला आप्पीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात येतो. 'छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?' असा तो प्रश्न असतो. यावर अप्पी असं उत्तर देते की अभिमानाने सर्वांचा उर भरून येतो.

यावर उत्तर देताना अप्पी म्हणते, ''तसं तर अनेक इतिहासकारांनी प्रत्येक पुस्तकात वेगळी नोंद केली आहे. वेगवेगळे संदर्भ आहेत. त्यांची उंची अंदाजे पाच फूट पाच इंच ते पाच फूट आठ इंच एवढी असेल.''त्यावर मुलाखतकार मला ठाम उत्तर हवंय, असं म्हणतात. त्यावर अप्पी म्हणते, ''मॅडम चार हजार सहाशे चार फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला. साडेतीनशे वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी मोजायची, नाही का..'अप्पीनं दिलेलं हे उत्तर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या उत्तराचं आणि मालिकेच्या प्रोमोचं सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लाखों नेटकऱ्यांनी त्याला पसंती दर्शवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने