अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय

मुंबई:  अमेरिकेला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं 'व्हिसा' शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.काही नॉन इमिग्रंट व्हिसावर  हे शुल्क वाढवण्यात आलंय. परराष्ट्र विभागाच्या या निर्णयामुळं भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना महागाईचा भार सोसावा लागणार आहे.अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं 25 डॉलर्सची वाढ केली असून सध्याच्या चलन दरानुसार, आता एका विद्यार्थ्याला 15 हजार 400 रुपये मोजावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ 30 मेपासून अंमलात येणार आहे.नवीन दर 30 मे पासून लागू

यूएस स्टेट डिपार्टमेंटनं जारी केलेल्या निवेदनानुसार, बिगर स्थलांतरित व्हिसासाठी शुल्काचे वाढलेले दर 30 मे 2023 पासून लागू होतील. या व्हिसांमध्ये व्हिजिटर, टुरिस्ट व्हिसा, स्टुडंट व्हिसा आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा इत्यादींचा समावेश आहे. व्हिसा शुल्क श्रेणीबद्ध पद्धतीनं वाढवण्यात आलं आहे.विद्यार्थ्यांना आता व्हिसासाठी 160 डॉलर्सऐवजी 185 डॉलर्स मोजावे लागणार आहेत. त्याच वेळी व्यापारी, गुंतवणूकदार आणि विशेष व्यवसाय असलेल्या अर्जदारांसाठी शुल्क 16,785 रुपयांवरून 25,792 रुपये करण्यात येणार आहे. रविवारच्या विनिमय दरानुसार भारतीय रुपयांत ही रक्कम 15 हजार 400 रुपये होते. या शिवाय इतर श्रेणीतील व्हिसांचे शुल्कही वाढवण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने