कुस्ती महासंघाकडून आंदोलक खेळाडूंना धमक्या! पुनियाचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रृजभुषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी ७ महिला खेळाडूंनी कुस्ती महासंघ आणि ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांमध्ये नावाजलेल्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे.बजरंग पुनियानं मंगळवारी आरोप केले की, भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रतिनिधींनी तक्रारदार महिला खेळाडूंना तक्रार मागे घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला तसेच धमकी दिली आहे. जंतरमंतर मैदानवर आंदोलनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यानं हा खळबळजनक आरोप केला आहे. आंदोलनाकर्त्या खेळाडूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.ऑलिम्पिकपटू असलेले बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी पुन्हा एकदा भारतीय कुस्ती महासंघ अन् याचे प्रमुख आणि भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाला बसले आहेत. कारण तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी यासंदर्भात आंदोलन करत त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. पण दिल्लीच्या कॉनॉट प्लेस पोलिसांकडून याप्रकरणी अद्याप एफआयआरही दाखल करण्यात आलेला नाही. तक्रारदार ७ महिलांमध्ये एका अल्पवयीन महिला खेळाडूचाही समावेश आहे.दरम्यान, या प्रकरणी चौकशीसाठी सरकारनं २३ जानेवारी २०२३ रोजी सहा सदस्यीय समिती नेमली होती. याबाबतचा रिपोर्ट या समितीनं ५ एप्रिल २०२३ रोजी सरकारला सादर केला. पण यातील तपशील सार्वजनिक करण्यात आला नव्हता. हा अहवाल अद्याप तपासला जात असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने