चॅम्पियन मॅग्नस कार्लसन विश्वविजेतेपद सोडणार; नवा विश्वविजेता कोण?

कझाकिस्तान : कझाकिस्तानची राजधानी असणाऱ्या अस्थानामध्ये यंदाची जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमधून २०१३ पासून विश्वविजेत्या असणाऱ्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने माघार घेतली आहे.त्यामुळे कझाकिस्तानची राजधानीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये बुद्धिबळाला नवीन विश्वविजेता मिळणार आहे. यंदा बुद्धिबळ अजिंक्यपदासाठी रशियाच्या इयान नेपोम्नियाची आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यात स्पर्धा होणार आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ९ एप्रिल ते १ मे या दरम्यान होणार आहे.

मॅग्नस कार्लसन याने या स्पर्धेमधून माघार घेतल्याने चीनच्या डिंग लिरेनला संधी देण्यात आली आहे. दुबाईमध्ये २०२१ साली झालेल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये इयान नेपोम्नियाची याने मॅग्नस कार्लसनला आव्हान दिले होते. मात्र या २०२१ साली झालेल्या या सामन्यात कार्लसनने ७.५-३.५ असा विजय मिळवला होता.मॅग्नस कार्लसन याने २०१३ पासून सलग एकदाही पराभव न होता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. मात्र यंदा या मानाच्या स्पर्धेमधून माघार घेतल्याने जगभरातील बुद्धिबळ प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.मॅग्नस कार्लसन याने यंदाच्या वर्षी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजयाची प्रेरणा नसल्याने माघार घेत असल्याचे कळवले आहे. त्यामुळे चीनच्या डिंग लिरेनला संधी देण्यात आली आहे. कॅन्डीडेट बुद्धिबळ स्पर्धेमध्ये उपविजेता राहिल्याने डिंग लिरेनला अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आमंत्रित करण्यात आले.मला काही मिळवायचे नाही : कार्लसन

मॅग्नस कार्लसन याने मागच्या वर्षी जुलै महिन्यातच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला होता. याबाबत अधिक बोलताना ‘‘मी अजून कोणत्याही बुद्धिबळ सामन्यात इतक्यात खेळू शकेन असे मला वाटत नाही. माझी मानसिक तयारी नसल्याने मी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाहीये.मला बुद्धिबळ या महान खेळामध्ये अजून काही मिळवायचे आहे असे वाटत नाही. मी माघार घेतली असली तरी सध्या जागतिक विजेतेपदासाठी दोन्ही खेळाडू अत्यंत गुणवान आहेत यात काहीच शंका नाही ’’ कार्लसन याने अशी प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान, २०२१ साली झालेल्या स्पर्धेनंतरसुद्धा मॅग्नस कार्लसन याने कदाचित आपण पुढील जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेणार नसल्याचे म्हटले होते. कार्लसनने या अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल काय लागेल, याचा अंदाज व्यक्त केला नसला तरी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक स्पर्धेवर नजर

  • ९ एप्रिलला पहिल्या फेरीला सुरुवात

  • १४ फेऱ्यांच्या स्पर्धेनंतर जेता मिळणार

  • अखेरची १४वी फेरी २९ एप्रिलला

  • टायब्रेक झाल्यास, ३० एप्रिलला

  • १ मे रोजी अंतिम दिवस

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने