मुंबई: बॉलीवुड मधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.पामेला आणि यश यांच्या लग्नाचा किस्सा फार वेगळाच आहे. मुमताजच्या आकंठ प्रेमात असलेल्या यश चोप्रांनी पामेला सोबत का केलं लग्न? जाणुन घेऊया..
यश चोप्रा आणि मुमताजचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. यश आणि मुमताज दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि लग्नही करणार होते,परंतु मुमताजच्या कुटुंबीयांनी यशचे नाते नाकारले! त्यामुळे यश चोप्रा प्रचंड दु:खात बुडाले.यश आणि पामेला यांची पहिली भेट दिल्लीतील स्टार क्रिकेट शोमध्ये झाली होती. यश आणि पामेला या दोघांमध्ये थोडंसं अंतर होतं. यश त्याच्या चुलत भावाला भेटण्यासाठी अनेक वेळा गेला, पण पामेला सोबत मात्र ते भेटले नाहीत किंवा बोलले नाहीत.
पुढे पामेला यांची पहिली भेट यशजींच्या भाचीच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात झाली. तिथे यशने पामेला यांच्या गाण्याचे कौतुकही केले.यानंतर कुटुंबातील कॉमन फ्रेंडच्या आईच्या माध्यमातून लग्नाची चर्चा सुरू झाली.पामेला यांनी असेही सांगितले की, ती अशा कुटुंबातून आली होती जिथे खूप शिस्त होती, पण यशची पत्नी झाल्यानंतर तिला फिल्मी दुनियेची ओळख झाली,जिथे कलाकार सकाळी लवकर घरी यायचे आणि तर रात्री चित्रपट, गाणी, संगीत या सर्वांवर चर्चा चालू असायची.हळूहळू पामेला यांनाही या जगाची सवय झाली. यश आणि पामेला यांनी सुखी संसार केला. यशजींचा सिनेमांचा चढउतार काळ या पामेला यांनी पाहिलाय. या सर्व काळात पामेला पत्नी म्हणून यश चोप्रांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.आज यश - पामेला दोघेही या जगात नाहीत. त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब या दोघांचे संस्कार आणि वारसा जपतील यात शंका नाही.