'उमर 55 की दिल बचपन का' भाईजानच नव्हे तर यांनीही केलंय कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम

मुंबई: ९० च्या दशकात बॉलिवूडने अनेक हिट सिनेमे दिलेत ज्याची आजही चर्चा होते. त्याकाळचे अभिनेते असोत किंवा अभिनेत्री यांच्या जोड्या आणि चित्रपटातील गाणी नेहमीच हिट ठरली.त्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक हिरे आणि हिरोईनस् आल्यात मात्र त्यांच्या जोड्या प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात कुठेतरी कमी पडतात. आता ९० च्या दशकातील अभिनेत्री या इंडस्ट्रीमध्ये कमी सक्रिय आहेत.त्यांची जागा अनेक नव्या अभिनेत्रींनी घेतली. मात्र बॉलिवूडमधले सुपरस्टार हिरो अजूनही बॉलिवूड चित्रपटांवर राज्य करत आहेत. त्यांनी आपल्या वयानुसार त्याच्या भुमिकेबाबत काहीच तडजोड केलेली नाही. ते आजही चित्रपटात हिरोच्या भुमिकेत प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. असे अनेक सपुरस्टार आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या हिरोइन्ससोबत काम केले आणि त्याची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली.

सलमान खान - पूजा हेगडे

याच ताज उदाहरण म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. सलमान सध्या त्याच्या किसी का भाई किसी की जान मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझरही नुकताच रिलिज झाला आहे.सलमान खानने त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अशा अनेक नायिकांसोबत काम केले आहे. त्यात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि दिशा पटानी या नावांचा समावेश आहे.आता या यादीत पूजा हेगडेचेही नाव जोडलं गेले आहे. पूजा हेगडे 32 वर्षांची असून सलमान सध्या 57 वर्षांचा आहे.शाहरुख खान - आलिया भट्ट

बादशाह शाहरुखने अनेक तरुण अभिनेत्रींसोबतही काम केले आहे. पण जेव्हा तो डिअर जिंदगी या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसला तेव्हा लोक त्यांच्या वयावरवर टोमणे मारु लागले. शाहरुख खान57 वर्षांचा आहे. तर आलिया भट्टचं वय ३० वर्षे आहे.

अमिताभ बच्चन - जिया खान

'निशब्द' या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत जिया खानही दिसली होती. त्यावेळी जिया खान फक्त 19 वर्षांची होती. आणि अमिताभचं वय ६४ होतं. मोठ्या पडद्यावर दोघांच्या एज गॅपची सर्वांनीच दखल घेतली होती.

अक्षय कुमार - इलियाना डिक्रूझ

रुस्तम हा अक्षय कुमारच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रूझ एकत्र दिसले होते. या चित्रपटातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेमही दिले. चित्रपटादरम्यान इलियाना डिक्रूज 28 वर्षांची होती, तर अक्षय 48 वर्षांचा होता. म्हणजेच दोघांमध्ये 20 वर्षांचे अंतर होते.

आमिर खान - असिन

आमिर खानचा 'गजनी' हा हिट चित्रपट कोणी सहज विसरु शकत नाही. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री असिन दिसली होती. आज आमिर खान 58 वर्षांचा आहे. तर असीनचे सध्याचे वय ३७ वर्षे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने