काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी उपमुख्यमंत्र्यांना मिळालं तिकीट

 बेंगळुरू : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी  आज तिसरी यादी जाहीर केली. पक्षानं 43 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.या यादीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणी मतदारसंघातून, तर कोलारमधून कोथुर्जी मंजुनाथ यांना तिकीट देण्यात आलं आहे.भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक दिवस आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षाचं सदस्यत्व घेतलं. भाजपनं यापूर्वी सवदी यांना अथणी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.तिकीट कापल्यामुळं संतापलेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते अथणीचे तीन वेळा आमदार राहिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने