अजित पवारांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 मुंबई: राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे..भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे.दरम्यान अजित पवार यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता. परंतु ते अद्याप मुंबईतच असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने