सुजात आंबेडकर स्टेजवर आले अन्... CM शिंदेंची 'ती' कृती चर्चेत;

मुंबई:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची काल १३२ वी जयंती होती. त्यानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्याचे मंत्री नेते यांच्यासोबत व्यासपीठावर घडलेल्या प्रसंगाचा हा व्हिडीओ आहे.मुंबई महापालिकेच्या वतीने चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर हे उपस्थित होते.व्यासपीठावरच्या पहिल्या रांगेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच इतर मंत्री बसले होते. तर बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले होते. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकरही व्यासपीठावर होते. पण रांगेच्या मागच्या बाजूला होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी पुढे यायला सांगितलं. मात्र पुढे बसण्यासाठी जागा नव्हती.त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सुजात यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था कऱण्यास सांगितलं, तेव्हा दीपक केसरकर यांनी स्वतः उठून त्यांना जागा दिली. मात्र सुजात यांनी नकार दिला. पुढे सुजात यांच्यासाठी खुर्चीची सोय झाली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोफा बाजूला सरकवून सुजात यांना पहिल्या रांगेत जागा करून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने