म्हणून अजय गोगावलेंनी सर्वांसमोर मागितली शरद पवारांची माफी, काय घडलं बघा

मुंबई: आज महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा लोकार्पण सोहळा पार पडला.महाराष्ट्र शाहीरच्या रिलिजला अवघे काही दिवस बाकी असताना महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी कलाकार, संगीतकारांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित केला.या सोहळ्यात महाराष्ट्र गीत असलेल्या जय जय महाराष्ट्र माझा गीताचे रिक्रिएट व्हर्जन लाँच करण्यात आले. या सोहळ्यात अजय गोगावले यांनी शरद पवारांची माफी मागितली. काय घडलं पहा..महाराष्ट्र शाहीर सिनेमातील महाराष्ट्र राज्यगीत लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. सोहळ्याला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. सोहळा सकाळी ११ दरम्यान सुरु झाला.



एकेक करून सर्व मान्यवर त्यांचं मनोगत व्यक्त करत होते. शरद पवार वेळेत उपस्थित होते. पण या सोहळ्याला यायला महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे संगीतकार - गायक अजय गोगावलेला यायला उशीर झाला.अजय येताच केदार शिंदेंनी त्याला मंचावर स्थानापन्न व्हायला सांगितलं. पुढे अजय गोगावले यांनी मनोगत व्यक्त करताना शरद पवारांची माफी मागितली.अजय म्हणाला.. "सगळ्यात आधी सर्वांची माफी मागतो.. मी वेळ ११.३० समजत होतो. मी actually इथेच राहत होते.. मला पवार साहेबांची वेळ महितीये.

तरी मी इथे जवळच राहत होतो. एका फंक्शन नंतर मी ओबेरॉयला राहायला गेलो उशीर नको व्हायला म्हणून.. तरीही उशीर झालाच.. सॉरी. सॉरी सर.." असं म्हणत अजयने शरद पवारांकडे बघत उशिरा आल्याबद्दल त्यांची माफी मागितली.महाराष्ट्र शाहीर सिनेमातील महाराष्ट्र राज्यगीत आज लाँच झालं. अजय गोगावले यांनी हे गीत गायलं असून या गीतात नागराज मंजुळे, आदेश बांदेकर, प्रथमेश परब, आकाश ठोसर, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, शिव ठाकरे, सिद्धार्थ जाधव,गश्मीर महाजनी,अभिजित खांडकेकर, प्रसाद ओक, उमेश कामत, सुयश टिळक, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, ललित प्रभाकर असे मराठी कलाकार झळकत आहेत.शाहिरांना या मराठी कलाकारांनी या गाण्याच्या माध्यमातून अनोखी आदरांजली वाहिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने