उन्हाळ्यात Diabetes वाढण्याचा धोका अधिक? अशी घ्या काळजी!

मुंबई: डायबटीज, मधुमेह हा असा आजार आहे.ज्याचे पेशंट दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यावर उपचार घेऊनही तो रोग समुळ नष्ट करता येत नाही. याचे कारण म्हणजे हा आजार थेट लोकांच्या आवडीच्या गोड पदार्थांवर मारा करतो. त्यामुळे लोक या आजाराला कंटाळलेले असतात.मधुमेहात लोकांना सतत खावंस वाटू शकतं. त्यांना सतत तहान लागू शकते. त्यामुळे हा आजार असलेल्या लोकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. या आजाराने त्रस्त लोकांसाठी प्रत्येक ऋतू आव्हाने घेऊन येतो.



आता उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. ज्या लोकांना मधुमेह आहे. त्यांचे शरीर डिहायड्रेड होऊ शकते. कारण शरीरात साखरेची पातळी जास्त असते. तेव्हा मुत्र विसर्जनाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मधुमेहाचे रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात.उन्हाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेड होण्यापासून वाचवले पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शुगर पेशंटनी नक्की काय काळजी घ्यायची हे पाहुयात.उन्हाळ्यात काळजी घेण्याचा विषय येतो. तेव्हा तज्ज्ञ सांगतात की, सर्वात आधी कोणता बदल करणे गरजेचे असेल तर तो म्हणजे एक्टीव्ह होणे. जेवण झाल्यावर तीन तासांनी अर्ध्या तास चालले पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतरही शतपावली केली पाहिजे.

फायबरचे पदार्थ खा

मधुमेह असलेल्या लोकांसाठी उच्च फायबरयुक्त आहार घेणे खूप महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात फायबर असलेले अन्न पचन मंदावते आणि रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते. असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.फायबरयुक्त पदार्थांमध्ये संपूर्ण धान्य जसे की ओट्स, ब्राऊन राइस, संपूर्ण धान्य ब्रेड आणि तृणधान्ये, फळे, बिया, नट, भाज्या जसे की झुचीनी, गाजर, टोमॅटो इ.

सरबत प्या पण..

उन्हाळ्यात सर्वात जास्त कोणतं पेय पिलं जात असेल. तर ते सरबत होय. सरबतामुळे आपलं शरीर डिहायड्रेड होण्यापासून बचाव होतो. पण, शुगर असलेल्या लोकांनी साखरेपासून बनवलेल्या गोड सरबतापासून दुर रहावे. त्यामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता असते.

पाण्याचे सेवन

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करा.दिवसाला तीन लिटर पाणी आपल्या शरीराला हवं असतं. तर, शुगर असलेल्या रूग्णांनी पाणी जास्त पिल्याने शरीरातील अतिरीक्त साखर मुत्रावाटे निघून जाते. आणि शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी होते. पाणी जास्त पिल्याने शरीर हायड्रेड ठेवण्यास मदत होईल.

शुगर तपासणे

मधुमेह असलेल्या लोकांनी शुगर सतत तपासली पाहिजे. मधुमेहाची पातळी लक्षात आली तर त्यामुळे किती सारखेची गरज आहे? हे लक्षात येते. त्या प्रमाणावरून काय खावे, काय नाही हे ठरवणे सोपे जाते.तुम्हाला इन्सुलिनचे सेवन देखील बदलण्याची आवश्यकता असू शकते म्हणून उन्हाळ्याच्या महिन्यांत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उन्हात फिरू नका

तुम्हाला माहिती आहे का ? सनबर्नमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. म्हणून सनस्क्रीनचा वापर करा तसेच बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस आणि छत्री वापरा.

कॅफिन सेवन कमी करा

उन्हाळ्यात कॉफी किंवा इतर कोणतेही एनर्जी ड्रिंकसारख्या कॅफिनचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

फळांचे सेवन करावे?

आपल्याकडचा उन्हाळा हा सुट्ट्यांचा काळ असतो. त्यामुळे लोक सुट्टीवर जातात. बाहेरचे खाणे वारंवार होते. शिवाय, आंबाप्रेमी मधुमेहींना या दिवसांत अधिक त्रास झाल्याचे दिसून येते. आंब्यासारख्या रसदार फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या दिवसांत आंब्यामुळे मधुमेह वाढण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये जास्त दिसून येते.

एखादी जखम झाल्यास

मधुमेही रुग्णांना उन्हाळ्याच्या दिवसांत एखादी जखम झाली आणि ती लवकर भरून निघत नसेल तर अशा व्यक्तींना गॅंगरिनचा धोका असतो. या दिवसांत घामामुळे त्वचा कायम ओलसर राहते. त्यामुळे ‘फंगल इन्फेक्‍शन’चा धोका वाढतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने