फलंदाजांच्या अपयशाची प्रीतीच्या पंजाब संघाला चिंता

मुंबई: फलंदाजांची सुमार कामगिरी तसेच अधिक निर्धाव चेंडू खेळण्याचे दडपण अशा कात्रीत सापडलेल्या पंजाब किंग्सचा सामना आज फॉर्मात असलेल्या लखनौ सुपर जायंटस संघाविरुद्ध होत आहे.शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाने यंदाच्या स्पर्धेत जोरदार सुरवात करत पहिले दोन सामने जिंकले, परंतु नंतरच्या दोन सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली ती फलंदाजांच्या अपयशामुळे.

शिखर धवन संघाचा भार एकाकी सांभाळत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो अपयशी ठरला आणि पंजाब संघाला ८ बाद १५३ एवढ्याच धावा करता आल्या. १० ते १५ या मधल्या षटकांत पंजाबची फलंदाजी अपयशी ठरत आहे. या दरम्यान ५७ निर्धाव चेंडू त्यांनी खेळले आहेत परिणामी पुरेशा धावा फलकावर लावण्यात त्यांना अपयश येत आहे.

आजचा सामना...पंजाब विरुद्ध लखनौ

ठिकाण : अटलबिहारी वाजयेपी स्टेडियम, लखनौ

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने