"राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना कोणी भेटायचं, हे पंतप्रधान कार्यालयातर्फे ठरवलं जातं"

दिल्ली:  सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. पुलवामा हल्ला सुरक्षेतल्या त्रुटीमुळे झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच मोदींना भ्रष्टाचाराची फारशी चिंता नाही, असंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दलही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणी भेटायचे, हे पंतप्रधान कार्यालयातर्फे ठरवलं जातं, असा गंभीर आरोप जम्मू काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. त्यांनी 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत हे खुलासे आणि गंभीर आरोप केले आहेत.



मोदींना भ्रष्टाचाराबाबत चिंता नाही

पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारशी चिंता वाटत नसल्याचा दावाही सत्यपाल मलिक यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे. ‘गोवा सरकारने दुर्लक्ष केलेल्या भ्रष्टाचाराच्या काही घटना मी मोदींच्या निदर्शनास आणून दिल्यामुळेच ऑगस्ट २०२० मध्ये त्या राज्याच्या राज्यपालपदावरून मला हटवून मेघालयला पाठविण्यात आले. पंतप्रधानांच्या भोवतीचे अनेक लोक भ्रष्टाचारात अडकले असून ते पंतप्रधान कार्यालयाच्या नावाखाली सर्व गैरप्रकार करतात. मी हे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले, मात्र त्यांना त्याची फिकीर आहे, असे वाटले नाही. त्यामुळे मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारशी चिंता नाही, एवढेच मी म्हणू शकतो, असं मलिक म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने