राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादीने कर्नाटकमधील निवडणूकीबाबत घेतला मोठा निर्णय

कर्नाटक: महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्तेवर राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर राज्यांमध्येही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, ‘राष्ट्रवादी’ने यापूर्वीही कर्नाटकात विधानसभेसाठी काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र, ‘राष्ट्रवादी’ला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता, तरीही यावेळी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा विचार राष्ट्रवादीने सुरू केला आहे. त्यामुळे कर्नाटकात राष्ट्रवादीला यश मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतला आहे. त्यानिमिताने महाराष्ट्राच्या जवळील राज्यांमध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्षविस्तार केला जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतला आहे. त्यानिमिताने महाराष्ट्राच्या जवळील राज्यांमध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्षविस्तार केला जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने