मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत आणि निर्माता करण जोहर यांच्यातील वाद बराच जुना आहे. इतकी वर्ष झाली पण दोघांमध्ये आजही तितकीच खुन्नस आहे. आता पुन्हा एकदा कंगना रनौतनं धर्मा प्रॉडक्शनच्या करण जोहरचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओत कंगनानं 'माफिया' म्हटल्यानंतरचं करण जोहरचं स्टेटमेंट ऐकायला मिळत आहे. आता बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतनं या व्हिडीओला शेअर करत त्याला 'चाचा चौधरी' म्हटलं आहे.
चला जाणून घेऊया आता कंगनानं कोणतं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.करण जोहरचा हा व्हिडीओ २०१७ सालचा आहे. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' च्या एका इव्हेंटमध्ये करण जोहरला एक प्रश्न विचारला होता जो कंगनाशी संबंधित होता.तेव्हा तो म्हणाला होता की, ''जेव्हा ती मला 'मूव्ही माफिया' म्हणते त्याचा नेमका अर्थ काय आहे? तिला मी काम नाही दिलं की मी माफिया झालो. नाही..आमची देखील चॉइस असते. मी तिच्यासोबत काम नाही करत. कारण मला तिच्यासोबत काम करायला आवडत नाही''.
आता कंगना रनौतनं या व्हिडीओला इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर करत लिहिलं आहे,''धन्यवाद चाचा चौधरी. तुमच्या या वक्तव्यासाठी. मी स्वतःला एक दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून सिद्ध केलंय. मी तर जे काही बोलले होते ते तुझ्या तोंडावर बोलले होते''.कंगना रनौत जेव्हा करण जोहरच्या चॅट शो मध्ये 'कॉफी विथ करण' मध्ये आली होती,तेव्हा कंगना रनौतनं त्याला नेपोटिझम या विषयावरनं डिवचलं होतं आणि तोंडावर 'मूव्ही माफिया' म्हणाले होते.या व्हिडीओवर सुरुवातील कंगना रनौतनं प्रतिक्रिया दिली आहे,जेव्हा ती इंडिया टुडे च्या इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तेव्हा म्हणाली होती की,''ते म्हणतायत माझ्याकडे काम नाही आणि मी त्यांच्यासमोर कामासाठी हात पसरलेयत. पण असं काही नाहीय. माझा म्हणण्याचा उद्देश आहे की माझे सिनेमे पहा म्हणजे माझ्यातलं टॅलेंट तुम्हाला कळेल. मी जे बोलते ते स्पष्ट बोलते''.