राहुल गांधींच्या दौऱ्यावरुन भाजपमध्ये दोन मतप्रवाह; मुनगंटीवारांची वेगळी भूमिका

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील, असं सांगितलं जातंय. मात्र त्यांच्या दौऱ्याबद्दल भाजपकडून परस्परविरोधी मतं पुढे आली आहेत.राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन उभं केलं. आता तेच राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचं सांगितलं जातंय.राहुल गांधींच्या दौऱ्याला सुरुवातीला भाजपने विरोध दर्शवलेला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांची राहुल गांधी यांनी माफी मागावी तरच त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला जाईल. असा इशारा त्यांनी दिला होता.बावनकुळे यांच्या भूमिकेला काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. राहुल गांधी यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय हालत होईल ते पाहा, असं वाक्युद्ध रंगलं होतं.

या सगळ्यावर प्रतिक्रिया देतांना सुधीर मुनगंटीवार यांनी निराळंच विधान केलं आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याला भाजप का विरोध करेल? भाजपने कायम लोकशाही परंपरा जपल्या आहेत. उलट त्यांनीच आणीबाणी लादून जनतेला तुरुंगात टाकलं होतं. आमचा त्यांच्या दौऱ्याला विरोध नाही, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.राहुल गांधी यांच्या दौऱ्यावरुन भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे थेटपणे राहुल गांधींच्या दौऱ्याला विरोध करतायत तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचा आणि आमचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने