'हिंदीत बोलू नकोस..', रहमान यांनी भर मंचावर पत्नीला टोकलं अन् मग पुढे जे घडलं ते केवळ कमाल..

मुंबई: ए आर रहमान यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी बॉलीवूड इंडस्ट्रीला दिली आहेत. ए आर रहमान यांना गोल्डन ग्लोब,नॅशल अॅवॉर्ड सारख्या बड्या पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आलं आहे. संगीताच्या विश्वात ए आर रहमान हे नाव खूप मोठं आहे.नुकताच ए आर रहमान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत गायक आपल्या पत्नीला हिंदी बोलू नकोस असं सूचित करत आहेत. रहमान यांच्या या वक्तव्यामुळे हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ए आर रहमान यांना पुरस्कार दिला जात आहे.मंचावर रहमान यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात,'पोन्नियन सेल्वन'च्या या संगीतकारानं आपती पत्नी सायरा बानो हिला 'हिंदीत नको,तामिळमध्ये बोल' असे सांगितले.यादरम्यानची एक क्लीप इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. ए आर रहमान सध्या मणिरत्नच्या 'पोन्नियन सेल्वन २' या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. हा सिनेमा २८ एप्रिलला पाच भाषांमध्ये सिनेमाघरात रिलीज होत आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की रहमान खूपच कमी बोलतात. काही दिवसांपूर्वीच रहमान यांनी आपली पत्नी सायरा बानोसोबत एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. हा तामिळ पुरस्कार सोहळा होता जिथे निवेदकानं रहमान यांची पत्नी सायरा बानो यांना मंचावर बोलावून दोन शब्द बोलण्यास सांगितले.रहमान यांच्या पत्नीनं हातात माइक पकडताच त्यांनी तिला तामिळ मध्ये बोलण्यास सांगितले. ते म्हणाले,''हिंदीत बोलू नकोस,तामिळमध्ये बोल''. अर्थात एवढं बोलूनही सायरा तामिळमध्ये बोलल्या नाहीत. ज्याच्यासाठी त्यांनी उपस्थितांची माफी मागितली.आपले पती रहमान यांचे कौतूक करत त्या म्हणाल्या,''यांचा आवाज माझा फेव्हरेट आहे. मला त्यांच्या आवाजावर प्रेम आहे. बस्स, मी एवढंच सांगू शकते''.ए आर रहमान आणि त्यांच्या पत्नीचा हा गोड संवादाचा व्हिडीओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. दोघांच्या मधील केमिस्ट्री देखील पाहण्यासारखी आहे. आपल्या पत्नीकडून प्रशंसा ऐकल्यावर रहमान यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू देखील पाहण्यासारखं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने