आंद्रे रसेलचा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करून विश्वक्रिकेटचा बनला बादशाह

हैदराबाद  : सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने १५ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या इनिंगमध्ये रसेलनं २ षटकार आणि चौकार मारला. रसेलने मोठी खेळी केली नाही, परंतु, टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका केला आहे. रसेलने टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार ठोकण्याची चमकदार कामगिरी केली आहे. रसेला आता सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रसेलच्या पुढे ख्रिस गेल आहे. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजारहून अधिक षटकार ठोकले आहेत. गेलच्या नावावर १०५६ षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. दुसऱ्या नंबरवर पोलार्ड आहे. पोलार्डने ८१३ षटकार ठोकण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.आता रसेलनंही टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. या लिस्टमध्ये टॉप ३ मध्ये तीन फलंदाज कॅरेबियन आहेत. यावरून असं स्पष्ट होतं की, विश्वक्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करण्यात कॅरेबियन खेळाडूंचा दबदबा आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ४७२ षटकार ठोकले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे.

गेलने आयपीएलमध्ये ३५७ षटकार मारले आहेत. डिविलियर्सने २५१ आणि रोहितने २५० षटकार आयपीएल सामन्यांमध्ये ठोकले आहेत. तर रसेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत १८८ षटकार ठोकले आहेत. केकेआरने गुरुवारी झालेल्या सामन्यात हैद्राबादचा ५ धावांनी पराभव केला. हैद्राबादला शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती.परंतु, वरुण चक्रवर्तीने फिरकीची जादू दाखवत शेवटच्या षटकात ३ धावा दिल्या आणि संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. वरुणने ४ षटकांत २० धावा देत १ विकेट घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने