DC vs CSK: धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने रचला इतिहास; आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणार ठरला पहिलाच संघ

चेन्नई : CSK became the first team in IPL -आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी शानदार पराभव केला. या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या विजयासह, चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२३ च्या १२ सामन्यांतून १५ गुण झाले आहेत. त्यांनी प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सीएसके संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय नोंदवताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.


सीएसके आयपीएलमधील पहिलाच संघ ठरला –
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेने ८ गडी गमावून १६७ धावा केल्या. यासह सीएसके हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याचा एकही फलंदाज एका डावात २५ पेक्षा जास्त धावा करू शकला नाही आणि तरीही संघ जिंकला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.
सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या –
चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने २४, डेव्हॉन कॉनवेने १० धावा, अजिंक्य रहाणेने २१ धावा, शिवम दुबेने २५ धावा, अंबाती रायडूने २३ धावा, रवींद्र जडेजाने २१ धावा केल्या. शेवटी महेंद्रसिंग धोनीने स्फोटक फलंदाजी करताना ९ चेंडूत २० धावा केल्या. मोईन अलीने ७ धावांचे योगदान दिले. यापैकी एकाही खेळाडूने २५ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. तरी देखील सीएसके संघाने १६७ धावा केल्या होत्या.
सामन्यानंतर धोनी आपल्या फलंदाजांवर नाराज दिसला –
या सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, आम्ही फलंदाजी म्हणून अजून चांगली कामगिरी करू शकतो. या खेळपट्टीवर असे काही शॉट्स होते, जे तुम्ही टाळणेच चांगले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. असे मानले जात आहे की, आयपीएल २०२३ हा एमएस धोनीचा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने