टाटांनी उंचावली भारताची मान; जगातील सर्वात नाविन्यपूर्ण कंपन्यांच्या यादीत मानाचे स्थान

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक कुटुंबापैकी एक असलेल्या टाटा ग्रुपने एक खास यश मिळवले आहे. जगातील सर्वाधिक इनोवेटिव्ह ५० कंपन्यांच्या यादीत टाटा ग्रुपला स्थान मिळाले आहे. या यादीत टाटाने २०वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे या यादीत भारतातील एकाच कंपनीला स्थान मिळाले आणि ती म्हणजे टाटा होय.

बोस्टन कसल्टिंग ग्रुपच्या मोस्ट इनोवेटिव्ह कंपनी २०२३ ची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी कंपन्यांची कामगिरी, अडचणी सहन करण्याची क्षमता आणि इनोव्हेशन सारख्या घटकांवर त्याचे स्थान ठरवते. टाटा ग्रुपने २०४५ पर्यंत नेट झीरो एमिशनचे टार्गेट ठेवले आहे. या यादीत आयफोनची निर्मिती करणाऱ्या अॅपल पहिल्या स्थानावर आहे. तर एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कारची कंपनी टेस्ला दुसऱ्या स्थानावर आहे. टेस्लाने गेल्या वेळीपेक्षा ३ स्थानांनी क्रमवारीत सुधारणा केली आहे.




ई-कॉमर्समधील अमेरिकेची दिग्गज कंपनी अमेझॉन यादीत तिसऱ्या स्थानावर तर गुगलची उपकंपनी अल्फाबेट चौथ्या स्थानावर आहे. बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट पाचव्या, अमेरिकेतील फार्मा कंपनी मॉडर्ना सहाव्या, दक्षिण कोरियाची सॅमसन सातव्या, चीनची हुआवे आणि बीवायडी तसेच सिमंस हे अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहव्या क्रमांकावर आहेत. फायझर ११व्या तर स्पेसएक्स १२व्या स्थानावर आहे. मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटाचे स्थान ५ स्थानांनी घसरून ती १६व्या स्थानावर पोहोचली आहे.

नेस्लेच्या क्रमवारीत २२ स्थानांची सुधारणा होत ते आता २७व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. उलाढालीचा विचार करता जगातील सर्वात मोठी कंपनी वॉलमार्टचे स्थान ३२ वरून ४४ इतके घसरले आहे. चीनच्या जॅक मा यांची कंपनी अलीबाबाचे स्थान २२ क्रमांकांनी घसरले आहे. सौदी अरबमधील दिग्गज कंपनी अरामको ४१व्या स्थानावर आहे. त र सोनीचे स्थान २२ क्रमांकांनी घसरून ते आता ३१व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने