हिंदू धर्मात लग्नासाठी सर्वाधिक लाल रंगाच्या पोशाखाचीच निवड का केली जाते?

भारत : हल्ली वधू मुलगी लग्नात तिच्या आवडीचा रंगाचा पोशाख परिधान करते. कोणी गोल्डन, कोणी पेस्टल तर पिंक कलरचा पोषाख परिधान करतात. मात्र प्राचीन काळापासून वधू लग्नात लाल रंगाचे वस्त्र परिधान करत आलेली आहे. मात्र वधूच्या लग्नाच्या कपड्यांसाठी लाल रंगच का निवडला गेला. यामागे नेमकं काय कारण होतं ते आपण जाणून घेऊया.
भारतीय लग्न हे त्यांच्या अनेक प्रथांसाठी आणि विधींसाठी कायम चर्चामध्ये असतात. एवढेच नाही वर्षोवर्ष चालत आलेल्या रीती आणि परंपरांच्या मागे अनेक शास्त्रीय कारणं देखील आहे. आज आपण हिंदू वधूच्या लग्नाचा पोशाख लाल रंगाचा असण्यामागचं कारण जाणून घेऊया.लाल रंगाचे कपडे घालण्यामागे आहे धार्मिक कारण
हिंदू धर्मात देवी-देवतांना साक्षी मानून वधू-वर एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देतात. एवढेच नाही तर लग्नसमारंभात लाल, पिवळा, हिरवा असे शुभ रंग वापरण्यात आले आहेत.
वधूचा पोशाख लाल असण्यामागे हे महत्त्वाचे धार्मिक कारण आहे. शक्ती, प्रेम, शौर्य, स्नेह यांचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या माता दुर्गेची अनेक रूपात पूजा केली जाते. भगवान शिवाची पत्नी, पार्वतीचे दुसरे रूप असल्यामुळे, माँ दुर्गा नेहमी लाल साडी, सिंदूर लावून श्रृंगारात असते. त्यामुळे विवाहित महिलांसाठी लग्नानंतर लाल रंगाचे महत्व वाढते. असे मानले जाते की, लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास विवाहित स्त्रीवर माता पार्वतीचा आशीर्वाद नेहमी राहतो.
प्रेमाचे प्रतिक
मानसिकदृष्ट्या, लाल रंगाचे महत्त्व वेगवेगळ्या लोकांसाठी भिन्न असू शकते. लाल रंग हा अनेक ठिकाणी प्रेम, करुणा, मिलन, उत्कटता, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काही लोक याला वैवाहिक जीवनाच्या (Marriage) प्रवासाचे प्रतीकही मानतात. याशिवाय अनेक ठिकाणी रक्ताचा रंग लाल असल्याने ते प्रजननक्षमतेचे प्रतीक मानले जाते.
वैवाहिक जीवनातील समृद्धीसाठी
लाल रंग हा मंगळाचा रंग मानला जातो. ज्योतिषशास्त्रात या ग्रहाचे विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की मंगळ तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा, आनंद, समृद्धी यासह सर्व चांगल्या गोष्टी घेऊन येतो आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत करतो.
लग्नात, वधू आणि वर सर्वात सुंदर आणि वेगळे दिसतात, म्हणून ते चमकदार रंगाचे कपडे परिधान करतात. अशा वेळी लाल रंगाचा सर्वाधिक वापर केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून समजून घेतल्यास, लाल रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते, ज्यामुळे तो दुरूनही सहज दिसू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने