टिपू सुलतान यांच्या खासतलवारीचा लंडनला लिलाव

लंडन : लंडनमध्ये २३ मे रोजी म्हैसूरचे राजा टिपू सुलतान यांच्या सोन्याचा मुलामा असणार्या खास तलवारीचा लिलाव होणार आहे. एका धनाढ्य इतिहासप्रेमीच्या खाजगी निवासस्थानात एका सुरक्षित काचेच्या पेटीत असलेली ही तलवार लिलावासाठी प्रदर्शित केली जाणार आहे.
टिपू सुलतान यांची ही तलवार एकेकाळी त्यांच्या राजवाड्यात खासगी खोलीत जपून ठेवण्यात आली होती. म्हैसूरचे सुलतान हैदर अली यांचे १७८२ मध्ये निधन झाल्यानंतर टिपू सुलतान सत्तेवर आले. त्यानंतर ही तलवार टीपू यांच्याकडे आली. या तलवारीवर राजस्थानच्या आदिवासी कलाकारीची झलक पाहायला मिळते. सुमारे ३ फूट लांबीची ही तलवार सोन्याचा मुलामा असलेली आहे. ही तलवार भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची कलाकृती मनाली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने