बॉलिवूडमधील या ५ सेलेब्रिटीजकडे आहे Rolls Royce कार..

नवी दिल्लीः काही कार फक्त ट्रान्सपोर्टेशनसाठी नाही तर स्टेट्स सिम्बॉलसाठी सुद्धा असतात. त्यामुळे रोल्स रॉयस कार असणाऱ्या व्यक्तीचे एक वेगळेच स्टेट्स असते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच ५ सेलेब्रिटिजकडे रोल्स रॉयस आहेत, यासंबंधी माहिती देत आहोत.

१. शाहरुख खान
या यादीत पहिल्या स्थानावर बॉलिवूड किंग शाहरुख खान आहे. शाहरुखकडे शानदार कारचे कलेक्शन आहे. शाहरुख खानकडे रोल्स रॉयस फँटम ड्रापहेड कूपे आहे. याचे प्रोडक्शन २०१६ पासून होत आहे. ही कार भारतात विकणाऱ्या रोल्स रॉयसची सर्वात महागडी कार होती. रोल्स रॉयस फँटम मध्ये ६.७ लीटर व्ही १२ इंजिन दिले आहे. जे ४६० बीएचपीचे पॉवर व ७२० न्यूटन मीटर चे टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहे.

२. प्रियांका चोप्रा
सुपरस्टार प्रियांका चोप्राकडे रोल्स रॉयस घोस्ट आहे. जी काळ्या रंगात आणि टॉप सिल्वर रंगात आहे. २०१० मध्ये आणले होते. याचे सर्वात आकर्षक फीचर साइड डोर दिले आहे. जे मागे हिंज करण्यात आले आहे. रोल्स रॉयस घोष्ट मध्ये ६.७ लीटर व्ही १२ इंजिन दिले आहे. जे बीएमडब्ल्यू मधून घेतले आहे. हे इंजिन ५६३ बीएचपीचे पॉवर व ८२० न्यूटन मीटरचे टॉर्क करते. यात ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहे.

३. ऋतिक रोशन

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला सुद्धा कारचे प्रचंड वेड आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस घोष्ट सीरीज २ कार आहे. सध्या या कारचे प्रोडक्शन बंद करण्यात आले आहे. रोल्स रॉयस घोष्ट २ कार २०१६ मध्ये बर्थडे वेळी खरेदी केली होती. रोल्स रॉयस घोस्ट २ मध्ये ६.६ लीटर व्ही १२ इंजिन दिले आहे. जे ५६३ बीएचपीचे पॉवर व ७८० न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहे. जे मागील चाकाला पॉवर देते.
४. विजय
साउथचा सुपरस्टार विजयची जास्त ओळख सांगायची गरज नाही. त्याच्याकडे एकापेक्षा एक शानदार रोल्स रॉयस कार आहेत. विजयला स्वतः कार चालवताना अनेक वेळा पाहिले गेले आहे. विजयकडे बीएमडब्ल्यू, ऑडी व मिनी कूपर सारख्या कंपन्यांच्या कार आहेत.
५. अजय देवगण
या सुपरस्टारकडे रोल्स रॉयसची कलनिन कार आहे. या कारला २०१९ मध्ये खरेदी केले होते. सध्या देशात विकली जाणारी सर्वात जास्त महागडी एसयूव्ही आहे. याची किंमत ६.९५ कोटी रुपये आहे. यात ६.८ लीटर व्ही १२ टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ५६० बीएचपीचे पॉवर व ८५० न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते. यात ८ स्पीड ऑटोमॅटिक दिले आहे. यात स्टँडर्ड रुपाने ४ व्हील ड्राइव्ह दिले आहे. यात ऑल व्हील स्टियरिंग व्हील दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने