'तो चरणस्पर्श की गुडघास्पर्श'; PM मोदींना राऊतही करणार वाकून नमस्कार

पापुआ न्यू गिनी : पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले. याचा फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते चरणस्पर्श आहे की गुडघास्पर्श ते नीट पाहा असा खोचक टोला लगावला.

खासदार संजय राऊत यांना पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांचे चरणस्पर्श केले याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राऊतांनी पापुआ न्यू गिनी कुठं आहे ते तुम्हाला माहिती आहे का? ते चरणस्पर्श आहे की गुडघास्पर्श ते आधी तुम्ही नीट बघा… नीट फोटो पाहा… असा टोला लगावला.




पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही सुद्धा ते समोर आले तर ते वयाने मोठे आहेत म्हणून नक्कीच त्यांना वाकून नमस्कार करू… पापुआ न्यू गिनी ६० लाख लोकसंख्येचा देश आहे. पूर्णपणे आदीवासी देश आहे. ६० लाख लोकसंख्येत साडे आठशे भाषा बोलल्या जातात. त्यांचा जगाशी काही संबंध नाही. संपूर्ण आदिवासी आणि अशिक्षीत देश आहे.

तर भाजपच्या लोकांना नमस्कार...

ज्या तिकडल्या पंतप्रधानांनी (जेम्स मारापे) मोदींचे चरणस्पर्श केला असे म्हणता आहात त्यांच्यावर काही काळापूर्वी भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. वित्तमंत्री असताना भ्रष्टाचाराच्या आरोपात ते वॉन्टेड होते.

त्यांनी चरणस्पर्श केला याचा आनंद आहे. पण अंदश्रद्धा, जादूटोणा यासाठी तो देश प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केले म्हणून भाजपचे लोकं इथं डंका पिटत असतील तर त्यांना माझा नमस्कार आहे, असेही संजय राऊत म्हणाले. खरंतर गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी पापुआ न्यू गिनी मध्ये जायला हवं, त्यांच्यासाठी तो अत्यंत योग्य देश आहे असेही राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने