धोनी नाही तर या CSK खेळाडूच्या नावावर आहेत तब्बल सहा जेतेपदं, पाहा कोण आहे तो

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच जेतेपदं पटकावली आहेत. चेन्नईने यावेळी पाचवे जेतेपद पटकावले आणि मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली. त्यामुळे धोनीच्या नावावर आता पाच जेतेपदं आहेत. पण चेन्नईचा असाच एक खेळाडू आहे ज्याच्या नावावर धोनापेक्षा जास्त जेतेपदं आहेत.
धोनीने चेन्नईच्या संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. कारण धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. या वर्षी धोनीने फिट नसतानाही त्याने दमदर कामगिरी केली. या वर्षी धोनी ज्या ज्या मैदानात गेला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केल्याचे पाहायला मिळाले. धोनीने या वर्षी बऱ्याच गोष्टी कमावल्या. धोनीच्या चाहत्यांची संख्या तर वाढलीच पण त्याने संघाला जेतेपदही जिंकवून दिले. धोनीने चेन्नईला हे पाचवे जेतेपद जिंकवून दिले आहे. पण चेन्नईच्या संघात असा एक खेळाडू आहे ज्याने आयपीएलची तब्बल सहा जेतेपदं पटकावली आहेत.


चेन्नईचा संघ हा नेहमीच गुणी आणि दुसऱ्या संघात संधी न मिळणाऱ्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानुसार चेन्नईने आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंना संधी दिली. जे खेळाडू अन्य संघांत चांगली कामगिरी करत नव्हते, ते चेन्नईमध्ये आल्यावर त्यांची कामगिरी चांगलीच सुधारल्याचे पाहायला मिळाले. या यादीमधील एक खेळाडू आहे तो अंबाती रायुडू. या वर्षी आयपीएलची फायनल सुरु होण्यापूर्वी रायुडूने आपली निवृत्ती जाहीर केली. पण रायुडू हा चेन्नईचा असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर सहा जेतेपदं आहेत. यापूर्वी रायुडू हा मुंबई इंडियन्सच्या संघात होता. रायुडू २०१० साली मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आणि त्यानंतर २०१७ सालापर्यंत तो त्याच संघात होता. त्यानंतर तो चेन्नईच्या संघाचा एक भाग होता. रायुडू जेव्हा मुंबईच्या संघात होता तेव्हा त्याचा तीन जेतेपदांमध्ये वाटा होता. त्यानंतर आता चेन्नईबरोबर असताना रायुडूने तीन जेतेपदांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आता रायुडूच्या नावावर सहा जेतेपदं आहे, जेवढी धोनीच्याही नावावर नाहीत.
रायुडूने आता आयपीएलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. पण धोनी अजूनही आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे धोनीला आता चेन्नईला सहावे जेतेपद जिंकवून देता येऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने