एका डझनमध्ये फक्त १२ अंडी किंवा केळी का असतात? १० किंवा १५ का नाही?

आजपर्यंत आपण एक डझनच्या प्रमाणात खूपदा गोष्टी खरेदी केल्या असतील. केळी, अंडी, स्टीलची भांडी अशा अनेक गोष्टी या एक डझन प्रमाणात देताना १२ या संख्येत दिल्या जातात. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की एका डझनमध्ये बाराच वस्तू हा नियम कुठून आला असावा? म्हणजे द्यायला गेलं तर एक डझन म्हणजे १० गोष्टी किंवा १५ गोष्टी असंही ठरवता आलं असतं पण मग १२ हा आकडा कसा काय ठरला? याचाच उलगडा करणारी माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आपण समजायला सोपे जावे म्हणून केळी व अंड्याचं उदाहरण पाहूया. एक डझनमध्ये केळी किंवा अंडी देण्यामागे दोन करणे आहेत. पहिले कारण म्हणजे ड्युओडिमिकल सिस्टीम ऑफ काउंटिंग. जुन्या काळात लोकं गोष्टींची गणना करण्यासाठी अवयवांचा वापर करायचे. जसे की बोटं. अंगठा सोडून जर तुम्ही चार बोटांमधील जॉइंट्स मोजले तर ही संख्या १२ अशी येते. त्यामुळेच मोजण्यास सोपे व्हावे म्हणून १२ या संख्येने मोजण्याची सुरुवात झाली.आता आपण दुसरे कारण पाहूया, १२ हा अंक विभागण्यासाठी सोपा आहे. जसे की केळ्याचा घड जर दोन गटात विभागायचा असेल तर ६-६, तीन मध्ये विभागणी करायची तर ४-४-४, आणि चार भागात विभागणी करायची तर ३-३-३-३ अशी गणना करता येते. यामुळे अधिक पर्याय मिळू शकतात. शिवाय तुम्हाला जर डझनचा पाव भाग हवा असेल तर तुम्हाला ३ केळी घेता येतात पण १० किंवा १५ संख्या असेल तर अडीच किंवा ४.७ अशी मोड करणे कठीण होते.

ही सोय पाहता डझनमध्ये सुरुवातीपासूनच १२ या संख्येत वस्तू दिल्या जातात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन फॅक्टससाठी लोकसत्ताच्या FYI सेक्शनला आवर्जून भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने