सकाळी उठून १ ग्लास पाणी पिण्याचे अफलातून फायदे, वजन कमी करण्यास हमखास मदत

महाराष्ट्र : सकाळी उठल्यानंतर रोज १ ग्लास पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. रोज सकाळी उठून किमान १ ग्लास गरम पाणी प्यावा असा डॉक्टरांचा आणि अगदी घरच्यांचाही सल्ला तुम्हाला ऐकायला येतो.

रोज सकाळी पाणी पिण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात असं आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी सांगितले. याचे नक्की आरोग्यासाठी कोणते फायदे होतात जाणून घ्या.

शरीराला किमान ८-१० ग्लास पाण्याची आवश्यकता असते. साखरयुक्त रस वा पेये पिण्यापेक्षा तुम्ही पाणी पिणे उत्तम. उठल्यावर १ ग्लास पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. पाणी प्यायल्याने अन्नाचा साठा जास्त राहात नाही आणि वेट लॉस होण्यास मदत मिळते.


हायड्रेशन

Hydration Benefits: रात्री साधारण ८ तास झोप होते आणि त्या वेळात शरीरात पाणी जात नाही. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झोपेतून उठून तुम्ही गरम पाणी प्यायल्यास, दिवसभर चांगले रक्ताभिसरण होते आणि शरीराचे तापमानही योग्य राखण्यास फायदा होतो. व्यवस्थित हायड्रेट राहाते.

मेटाबॉलिजम प्रक्रिया होते चांगली

वजन कमी करण्यासाठी शरीरातील मेटाबॉलिजम प्रक्रिया चांगली असावी लागते. सकाळी उठल्यावर १ ग्लास पाणी प्यायल्यास, मेटाबॉलिजम प्रक्रिया अधिक चांगली होण्यास मदत मिळते. तसंच कॅलरी घटविण्यासही मदत मिळते.

पचन चांगले होते

सकाळी उठून पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ राहाते आणि पचनक्रिया अधिक चांगली होते. यामुळे मल मऊ होण्यास मदत मिळते. तसंच बद्धकोष्ठेतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.

विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत

सकाळी उठून लवकर पाणी प्यायल्यास आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. विषारी पदार्थ बाहेर गेल्याने त्वचा चांगली राखण्याचा फायदा होतो. दिवसभर त्वचा हायड्रेटेड आणि तेजस्वी राहून निरोगी राहते. तसंच तुमच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर येत नाहीत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने