कॅलिफोर्नियात भूकंप ५.७ रिश्टर स्केल तीव्रता

सॅक्रमेंटो : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या उत्तरेकडील भागात आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी मोजण्यात आली आहे.या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.पॅसिफिक कोस्ट आणि नेवाडाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय उत्तरेकडील राज्याच्या अर्ध्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीच्या काळात भूकंपाची तीव्रता ५.७ नोंदवली गेली असली तरी त्यानंतर त्याची तीव्रता ५.४ इतकी नोंदवण्यात आली. यूएसजीएस वेबसाइटनुसार, नंतर भूकंपाची तीव्रता ५.५ इतकी नोंदवली गेली. भूकंपानंतर पाच आफ्टरशॉकची नोंद झाली आहे.यूएसजीएसच्या मते, सॅक्रामेंटोच्या ईशान्येस सुमारे १२० मैल अंतरावर असलेल्या अल्मनोर तलावाजवळ पूर्व किनाऱ्यापासून सुमारे २.५ मैल अंतरावर हे भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा मात्र देण्यात आलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने