पुण्यात मोठी घटना, विमाननगरमधील एका आयटी हबच्या चौथ्या मजल्यावर आग

पुणे : विमाननगर भागामध्ये असणाऱ्या एका आयटी हबमध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आयटी पार्कच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिका अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, दुपारी १:३० च्या सुमारास चौथ्या मजल्यावर आग लागली. आगीमुळे संपूर्ण मजल्यावर धूर दिसू लागल्याने संबंधित कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी तात्काळ बाहेर आले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, सद्या आग नियंत्रणात आणण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने