कोल्हापुरातील कोपेश्वर मंदिरात इतिहासाची पानं उलटली, थेट रोमन साम्राज्याशी कनेक्शन

 कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपात रोमन साम्राज्य व रोमन व्यापाराचा नाइन मेन्स मॉरीस व पंचखेलीया या खेळांचे अवशेष सापडले आहेत. नाशिक येथील नासिकच्या प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख सोज्वळ साळी व रत्नागिरीच्या स्नेहन बने यांनी हे अवशेष शोधल्याने प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेत या खेळांची नोंद व दस्तऐवजीकरण करण्यात यश आले आहे.

सोज्वळ साळी यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध शहरात असलेल्या मंदिरात, लेणीमध्ये व टेकडीवर प्राचीन पटखेळ (बैठेखेळ) शोधलेले आहेत. ज्यात नासिकमधील त्रिरश्मी लेणी, गोंदेश्वर मंदिर, अंकाई लेणी, ढग्या डोंगर, त्रिंगलवाडी लेणी, पासून लोणार सरोवराभोवती असलेल्या मंदिरामध्ये तसेच महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर पटखेळ शोधलेली आहेत. महाराष्ट्रात ९०० पेक्षा जास्त खेळांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या “ प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेंतर्गत” सुरु आहे.
प्राचीन व्यापारी मार्गांवर व्यापारी, प्रवासी, पर्यटक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रवास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर या मंदिराच्या सभामंडपात रोमन साम्राज्य व रोमन व्यापाराचा नाइन मेन्स मॉरीस व पंचखेलीया या खेळांचे अवशेष सापडले. पंचखेळीया/पंचखेलीया हा खेळ श्रीलंकेतील विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा खेळ असून हा खेळ बैठे खेळातील शर्यतीचा खेळ म्हणून ओळखला जातो.

नवकंकरी या खेळाला मराठीत फरे-मरे या नावानेसुद्धा ओळखले जाते. तर इंग्रजीमध्ये दि मिल गेम, मेर्रील्स, नाईन पेंनी मार्ल, व उत्तर अमेरिकेत कॉवबॉव चेकर्स यानावाने ओळखले जाते. नाइन मेन्स म्हणजे ९ माणसे म्हणजेच हा खेळ २ खेळाडू बसून खेळू शकतात. या खेळाचे इतर ३ प्रकार पाहावयास मिळतात ज्यात ३ मेन्स मॉरिस, ६ मेन्स मॉरिस, १२ मेन्स मॉरिस हे आहेत. या खेळाचे नियम हे फुल्ली-गोळा प्रमाणे असले तरी हा धोरणात्मक खेळ आहे.

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या स्वर्ग मंडपाचे आकर्षण सर्वांनाच आहे. या मंदिरात असलेले शिल्प, त्यावरील अभूषणे, दिग्पाल याने हे मंदिर नटलेले असल्याचे दिसते. व जगभरातील अनेक पर्यटक प्राचीन काळापासून ते आजपर्यंत येथे येत असल्याचे निदर्शनास येते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने