गोव्याची ओळख असलेला ‘मानकुराद’ एक आंबा चक्क १५० रुपयांना!

मडगाव – महाराष्ट्रात हापूस आणि गोव्यात मानकुराद आंबा सर्वाधिक प्रसिद्ध आंबा मानला जातो. मात्र यंदा अद्याप आवक वाढली नसल्याने मानकुराद हा गोव्याची ओळख असलेला आंबा मडगावच्या बाजारात भाव खाताना दिसत आहे. मानकुराद आंब्याचे एक फळ चक्क १५० रुपयाला विकले जात आहे.

मानकुराद हा एक आंबा

१५० रुपये असताना महाराष्ट्रातील हापूसचे एक फळ ३० ते ५० रुपयांत मिळत आहे.मडगावचे प्रसिद्ध आंबा व्यापारी उदय नाईक यांनी सांगितले की, आता मानकुराद हा चढ्या दराने विकला जात असला तरी पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढून हा आंबा सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येऊ शकेल. मार्च महिन्यात मानकुरादचे छोटे फळ अडीच हजार रुपये प्रति डझन दराने विकले जात होते. आताही घाऊक बाजारात शेकडा १५ हजार रुपये दराने मानकुराद विकला जात आहे. या आंब्याबरोबर हाऊस, पायरी, शेंदूर आणि शिबीर अशा विविध प्रकारचे आंब्यासारखे मडगाव बाजारात दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने