१४ वर्ष रात्री जेवलाच नाही मनोज वाजपेयी, असा आहे रोजचा डाएट प्लॅन

मुंबई : आपल्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडचा आपला ‘भिकू म्हात्रे’ अर्थात मनोज वाजपेयीने गेल्या १४ वर्षात रात्री जेवणच घेतलेले नाही. आपल्या रियालिस्टिक आणि ताकदी अभिनयाने त्याने नेहमीच प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. चांगल्या भूमिकेसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे असे मनोजचे म्हणणे आहे.
एका मुलाखतीमध्ये मनोजने सांगितले की, १४ वर्षे त्याने नक्की रात्रीचे जेवण का घेतले नाही. त्याच्या निरोगी शारीरिक स्वास्थ्याचे नक्की काय रहस्य आहे याचाही त्याने उलगडा केलाय. ही मुलाखत सध्या खूपच व्हायरल होत असून मनोजने १४ वर्षांपासून Intermittent Fasting चा आधार घेतल्याचे सांगितले आहे. नक्की कसा आहे हा डाएट प्लॅन जाणून घ्या.


गेल्या १४ वर्षांपासून रात्री जेवत नाही
‘कर्ली टेल्स’मध्ये मुलाखतीत मनोज वाजपेयीने सांगितले की, गेल्या १४ वर्षांपासून तो रात्री जेवलेला नाही. अगदीच खूप भूक लागली तर हेल्दी फूड म्हणून काही बिस्किट्स खाऊन अथवा अगदी थोडेसे खाल्ले जाते. मात्र रात्रीचे जेवण असा फंडा आयुष्यात राहिला नाहीये. यामागे नक्की काय कारण होते तेदेखील त्याने सांगितले.
डॉक्टर ठरले कारण
याचे एक मजेशीर कारण मनोजने यावेळी सांगितले. डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की रात्री जेवण लवकर जेवत जा नाही तर पोटात अन्न पडून राहाते. पडून राहते हा शब्द आपल्या डोक्यात रूतून बसल्यामुळे एक भीतीच निर्माण झाली आणि त्यानंतर रात्रीचे जेवण पूर्णतः बंद केले. NCBI ने केलेल्या शोधानुसार, ज्या व्यक्ती लवकर संध्याकाळी जेवतात, त्यांना लठ्ठपणाचा धोका राहात नाही.
आजोबांकडून घेतली प्रेरणा
आपले आजोबा अत्यंत बारीक होते मात्र फिट होते असंही या मुलाखतीत मनोजने सांगितले. तर त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत त्यांचे डाएट फॉलो करायला सुरूवात केली. यावेळी सुरूवातील खूपच त्रास झाला मात्र नंतर खूप उत्साही आणि हेल्दी वाटू लागले.
यालाच Intermittent Fasting म्हणतात हे हळूहळू कळायला लागले असंही त्याने सांगितले आणि मग रात्रीचे जेवण बंद केले. किमान १२ तास उपाशी राहणे यासाठी गरजेचे आहे.
अशी भागवतो भूक
सुरूवातीला १ आठवडा त्रासदायक ठरला. रात्री खूप भूक लागायची. मग दोन हेल्दी बिस्किट्स आणि खूप पाणी पित त्याने आपली भूक भागवली आणि यामुळे शरीराचे नुकसानही होत नाही त्याच्या लक्षात आले आणि मग Intermittent Fasting अंगवळणी पडत गेले असेही त्याने नमूद केले.
डायबिटीस कोलेस्ट्रॉल राहते नियंत्रणात
वयाच्या ५४ व्या वर्षीही मनोज वायपेयीचे वय कळून येत नाही. अत्यंत फिट आणि उत्साही अशा या अभिनेत्याने Intermittent Fasting चा फायदादेखील सांगितला. रक्तातील साखर न वाढणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाणे, तसंच हृदयविकारासारख्या आजारापासून लांब राहाता येते. तर सध्या एका चित्रपटात काम करत असून सकाळी ९ ते दुपारी ३ इतक्या वेळातच आपण जेवत असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.
Intermittent Fasting म्हणजे नेमके काय?
साधारण १६ तास उपाशी राहणे हा डाएटिंगचा एक भाग आहे आणि यालाच Intermittent Fasting असे म्हटले जाते. जे सध्या ट्रेडिंग आणि प्रसिद्ध होतंय. बरेच सेलिब्रिटी सध्या हा ट्रेंड फॉलो करत आहेत. दिवसातले काही तासच तुम्हाला या डाएट प्लॅनमध्ये खायचे असते इतर वेळी तुम्ही खाऊ शकत नाही. मात्र यामुळे चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येतंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने