गुडबाय सेल्फी, मैदानात सर्वांचे आभार.. घरच्या मैदानात धोनीने खेळला शेवटचा सामना?

चेन्नई: धोनी धोनी… खचाखच भरलेले एमए चिदंबरम स्टेडियम. पिवळ्या जर्सी घालून हातात सीएसकेचे पोस्टर घेऊन बसलेले हजारो लोक. माही संपूर्ण टीमसोबत मैदानात फिरत रॅकेटने टेनिस बॉल स्टँडवर मारून चाहत्यांचे आभार मानतो. या सर्व गोष्टींचा नेमका संदर्भ काय? धोनीने शेवटचा आयपीएल सामना त्याच्या घरी म्हणजेच चेन्नई येथे खेळला आहे का? असे प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. रविवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात काही विलोभनीय दृश्य पाहायला मिळाली. १६व्या मोसमातील घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा हा शेवटचा सामना होता.



ऐतिहासिक दृश्य
१४ मे ला रात्री चाहते असो वा खेळाडू, संपूर्ण चेन्नई भावूक झाली होती. धोनीने मैदानावर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्याच्या गुडघ्याची जुनी दुखापत पुन्हा दिसून आली. तो गुडघ्याला नी-कैप घालून मैदानात फिरून सगळ्यांचे आभार मानत होता. यादरम्यान महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना त्यांच्या शर्टवर ऑटोग्राफही देण्यात आला. KKRचा रिंकू सिंग, जो सामनावीर ठरला, तो देखील ऑटोग्राफ मागण्यासाठी आला, थलाने त्यालाही निराश केले नाही. पण या सगळ्यात पुन्हा तोच प्रश्न, धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळताना दिसणार आहे का?
अजून दोन सामने

आता चेन्नईत आणखी दोनच सामने होणार आहेत. २३ मे रोजी क्वालिफायर-१ आणि २४ मे रोजी एलिमिनेटर चेपॉक येथेच खेळवला जाईल. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचला, तर या मैदानावर माहीच्या चाहत्यांना त्याची आणखी एक झलक पाहायला मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. असो, धोनीचा हा शेवटचा सीझन असेल, अशी चर्चा जोर धरून आहे. गेल्या काही वर्षांपासून तोही निवृत्ती घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण जेव्हा त्याला याबाबत प्रश्न विचारला जातो तेव्हा तो आपल्या विनोदी उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित करतो.

पुढचा सामना दिल्लीविरुद्ध
सध्या चेन्नई सुपर किंग्ज १३ सामन्यांतून १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. CSK आता शनिवार, २० मे ला अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. सीएसकेचा हा शेवटचा लीग सामना असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने