पंढरपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

 पंढरपूर : उकाड्याने हैराण झालेल्या पंढरपूरकर वासीयांना पावसाने दिलासा दिला. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस तर शहरात हलक्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत.गेले काही दिवस उन्हाचा पारा चाळीशी पार झाला होता. त्यामुळे नागरीक उन्हाने त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी पाचच्या सुमारास वारे वाहू लागले. पुढे सोसाट्याचा वारा सुटला. शहरात या वार्याने अनेकांची धांदल उडाली. तर आडोसा शोधून थांबले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी शहरात कोसळल्या. शहरात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. ग्रामीण भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या आधी पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. त्यात या पावसाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे शहरात या पावसाने दिलासा मिळाल्याने नागरीक सुखावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने