नवीन रेल्वे ॲप लाँच, कन्फर्म तिकिटासोबत मिळेल Netflix ची मजा

भारत : NuRe भारत नेटवर्क आणि रेलटेल कडून एक नवीन रेल्वे ॲप PIPOnet लाँच करण्यात आला आहे. या ऑल न्यू रेल्वे पॅसेंजर ॲप मध्ये एका सोबत अनेक खास सर्विसचा आनंद घेता येऊ शकतो. यात ई-टिकटिंग सोबत प्रवासात कुठे थांबण्यासाठी हॉटेल बुकिंग आणि इंटरटेनमेंट ॲप्सचा समावेश करण्यात आला आहे. RailTel ने म्हटले की, त्यांच्याकडून NuRe भारत नेटवर्कसोबत एक्सक्लूसिव पार्टनरशीप करण्यात आली आहे.पुढील आठवड्यापर्यंत लाँच होऊ शकते हे ॲप
हे ॲप पुढील दोन आठवड्यात अँड्रॉयड प्ले स्टोर वर डाउनलोडसाटी उपलब्ध करण्यात येईल. परंतु, हे ॲप iOS यूजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल, याची सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. कंपनीच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडून ॲप मध्ये Netflix, Uber, Ola सारख्या सर्विसचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, या प्लॅटफॉर्मवर पॅसेंजर ऑनलाइन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, थांबण्यासाठी रिझर्वेशन, फूड सारखी सुविधा मिळते. या ॲपवर जाहिरातीसाठी स्पेस उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनी या ॲपमधून पुढील ५ वर्षात १ हजार कोटी रुपयाचे रिवेन्यू ठेवण्याचे लक्ष ठेवले आहे.
फ्रीमध्ये नाही मिळणार सर्विस
या ॲपवर तिकीट सोबत कोणतेही सर्विस फ्रीमध्ये मिळणार नाही. याचाच अर्थ ऑनलाइन रेल्वे तिकीटसाठी पैसे द्यावे लागतील. तसेच तुम्हाला जर अन्य सर्विस हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावी लागतील.
सिंगल ॲपमध्ये खूप सारी सुविधा
PIPOnet च्या सिंगल रेल्वे ॲप मध्ये तुम्हाला अनेक ॲप्सची सुविधा मिळेल. त्यामुळे यूजर्सला वेगवेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने