'ते' नसते तर आजही असंख्य मुली व महिला जिवंत जाळल्या गेल्या असत्या!

इंडिया : १८ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारताची सामाजिक आणि आर्थिक स्थिती खूप खराब होती. भारतीय समाज वाईट आणि अन्यायकारक चालीरितींच्या विळख्यात अडकला होता. अशातच राजा राम मोहन राय यांच्या कार्याने भारतीय समाज आमूलाग्र बदलला. त्यांना त्यांच्या कार्यामध्ये मोठा विरोधही झाला, पण तरीही त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं.




भाषा तज्ज्ञ

राजा राम मोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी झाला. इतर भारतीय परिवारांप्रमाणेच त्यांच्या परिवारामध्येही हुंड्यासारख्या कुप्रथा सुरू होत्या. लहानपणी त्यांनी आपल्या बहिणीला सती जाताना पाहिलं होतं, त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. पण त्यांनी शिक्षण घेतलं आणि संस्कृत, पारशी आणि इंग्रजी भाषेमध्ये विद्वत्ता मिळवली. याशिवाय ते अरबी, लॅटिन आणि ग्रीक भाषेचे जाणकार होते.

सती प्रथा निर्मुलन

सती प्रथा निर्मुलनाचं श्रेय राजा राम मोहन राय यांना जातं. लहानपणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी आपल्या १७ वर्षीय बहिणीला सती होताना पाहिलं आणि त्यामुळे त्यांना त्या मागची वेदना लक्षात आली. त्या काळात कोणतीही स्त्री विधवा झाल्यास तिला आपल्या पतीच्या चितेवर जिवंत जाळलं जात होतं. राय यांच्या बहिणीने खूप विरोध करूनही तिला जबरदस्ती जिवंत जाळण्यात आलं.

शिक्षणासाठी कार्य

राजा राम मोहन राय यांनी आधुनिक शिक्षणासाठीही काम केलं. भारतातल्या चांगल्या प्रथा परंपरा आणि पश्चिमी संस्कृती यांच्या समन्वयाने शिक्षण व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी स्वतः देशात खूप शाळांची स्थापना केली. या शाळांमध्ये आधुनिक शिक्षण दिलं जातं होतं. त्यांच्या लिखाणाचा प्रभाव फक्त भारतच नाही तर ब्रिटन आणि अमेरिकेतल्या लोकांवरही पडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने