प्रवास होणार सुखकर! वेरळ-मेढा-पाचवड नवीन राज्य मार्ग होणार; शासन निर्णय जारी

खेड : सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडील भाग आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या वेरळ खोपी फाटा ते कुळवंडी- खोपी-मेढा-पाचवड ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ दरम्यान १३१ किमी अंतराचा नवीन राज्य मार्ग तयार होणारं आहे.

या प्रस्तावात सातारा जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग-१९, प्रमुख जिल्हा मार्ग-१४४ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग-१९ यांचा दर्जा सुधारून नवीन राज्यमार्ग क्रमांक ४६१ तयार करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने ९ मे रोजी शासन निर्णय काढला आहे.
दक्षिण उत्तर असलेले पुणे बंगलोर व मुंबई गोवा हे दोन राष्ट्रीय महामार्ग (National Highway) या नवीन राज्य मार्गामुळे जोडले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्हा थेट सातारा जिल्यातील प्रमुख शहरांशी जोडला गेल्याने पर्यटन व व्यापार उदिम यामध्ये वाढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गावर असेलल्या खोपी फाटा ते सातारा जिल्ह्यातील अकल्पे या दरम्यान एसटी वाहतूक सुरू असणारा मार्ग उपलब्ध आहे.

मात्र, या मार्गावरील सुमारे दीड किमीचा भाग पावसाळ्यात वाहतुकीला धोकादायक असतो. दरम्यान या प्रस्तावित राज्य मार्गावर सातारा व रत्नागिरी जिल्ह्याना जोडणारा रघुवीर घाट गेल्या काही वर्षात धोकादायक ठरला आहे. रस्त्याचा दर्जा सुधारल्यास रघुवीर घाटाच्या दुरुस्तीला चालना मिळून हा घाट वाहतुकीला सुलभ होण्याची आशा वाहनचालकांनी केली आहे.

पर्यायी मार्ग उपलब्ध

रघुवीर घाटातील पावसाळी पर्यटनाला या राज्यमार्गामुळे अधिक चालना मिळेल. पावसाळ्यात अतिवृष्टीटीमुळे कुंभार्ली व आंबा हे प्रमुख घाट बंद पडल्यास आणखी एक नवीन पर्यायी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यातील वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने