कोरियन महिला जगात भारी, त्यांच्यासारखी काचेची त्वचा मिळविण्यासाठी रात्री चेहऱ्यावर लावा हे सीरम

जर तुम्हाला कोरियन मुलींसारखी काचेची त्वचा हवी असेल तर तुम्हाला त्यांच्या घरगुती उपायांबद्दल माहिती असायला हवी. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कोरीयन महिला korean glass skin overnight चेहऱ्यावर कॉस्मेटिक उत्पादने लावत नाहीत त्या घरगुती उपाय वापरतात. या घरगुती उपायांमध्ये कोरियन मुली तांदळाचे पाणी भरपूर वापरतात, मग ते केसांना चमक आणण्यासाठी किंवा त्वचेला वाढवण्यासाठी. चला तर मग जाणून घेऊयात हे घरगुती सिरम आपण कसं बनवू शकतो. लोशन मास्कचा वापर
कोरीयन महिला लोशन मास्कचा वापर करतात. यामुळे त्याच्या स्किनला सुरकत्या नाही पडत. कापूस किंवा कॉटनच्या कपड्याने हे लोशन चेहऱ्याला लावतात. त्यानंतर कमीत कमी १० मिनिटं चेहरा झाकून ठेवा. हा उपाय तुम्ही महिन्यातून दोनवेळा करू शकता.
नॅचरल ऑईल
या महिला खास प्रकारचं नॅचरल ऑईल वापरतात. ज्यामुळे त्यांची स्किन मॉस्चराईज राहते. यासाठी ते रोज अॅसेंशियल ऑईल जसं की, चंदनाचं तेल आणि लेवेंडर ऑईलने बॉडी मसाज करतात. त्याच्या स्किन केअरमध्ये मसाज करणे महत्त्वाचे असते.
उत्तम आहार
बाहेरी सौंदर्यापेक्षा शरीरात असलेले अन्नपदार्थ सुंदरता वाढवण्यास मदत होते. कोरीयन महिला मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या फळ, मासे खातात. यांच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट, विटामिन ई आणि ओमेगा-३ मिळतं. सहाजिकच त्यांच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

असे तयार करा मिश्रण

यासाठी एका छोट्या भांड्यात दोन चमचे तांदूळ रात्रभर भिजवून ठेवावेत, त्यानंतर त्याचे पाणी वेगळे करून त्यात व्हिटॅमिन ई, कोरफड जेल आणि खोबरेल तेल मिसळून एका छोट्या डब्यात ठेवावे. त्यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. असे केल्याने काही दिवसातच तुमच्या त्वचेत मोठा बदल दिसून येईल.

असा होईल फायदा

तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी होतील आणि सुरकुत्याही निघून जातील आणि बारीक रेषाही कमी होतील, म्हणून आजपासूनच ही नाईट क्रीम किंवा सिरम लावणे सुरू करा आणि तुमच्या खराब झालेल्या त्वचेपासून मुक्त व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने