२ कोटी बालकांची आरोग्य तपासणी

पुणे : कुटुंबकल्याण विभागातर्फे जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २ कोटी १२ लाख २४ हजार ५८ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.

या अभियानात तपासणी केलेली ९ लाख ५० हजार १३६३ बालके आजारी आहेत. त्यापैकी ६ लाख ७८ हजार ६४ बालकांवर उपचार करण्यात असून ३ लाख ४ हजार १८३ बालकांना पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.शून्य ते १८ या वयोगटातील मुलांची तपासणी या अभियानात करण्यात आली होती. ज्या मुलांना गंभीर आजा आहेत किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये ४,७२० बालकांना शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे निदान झाले आहे. यातील १,७०८ बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने