या गाड्यांसोबत मिळेल स्वस्तात सनरूफची मजा, फीचर्स एकापेक्षा एक भारी

नवी दिल्लीः भारतात सध्या अनेक गाड्या खरेदी करताना ग्राहकांकडून सनरूफची मागणी होत आहे. परंतु, सनरूफ जास्त करून बंद असतात. पण भारतात अनेकांना हे आपला शौक पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्याला टशन देण्यासाठी याचा वापर केला जातो. स्वस्त किंमतीत कारमध्ये एक इलेक्ट्रिक सनरूप मिळणे एक स्पेशिलिटी आहे. ज्याला कार मॅन्युफॅक्चरर यूएसपी प्रमाणे वापर करतात. सनरूफ आधी काही वर्षापूर्वी केवळ प्रीमियम गाड्यात मिळत होते. परंतु, आता हॅचबॅक पासून सब ४ मीटर एसयूव्ही पर्यंत छोट्या व्हीकल्स मध्ये सुद्धा मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सनरूफचे सर्वात स्वस्त कारची लिस्ट देत आहोत. कारची किंमत पाहून तुम्ही ठरवा. तुमच्यासाठी कोणती फायदेशीर आहे.
Hyundai Venue
Hyundai वेन्यू अनेक फीचर्स सोबत येते. ज्यात काही सेगमेंट फर्स्ट सुद्धा आहे. परंतु, ज्यावेळी सनरूफचा विषय येतो. त्यावेळी वेन्यू मध्ये सनरूफ मिळणारी भारतातील सर्वात स्वस्त व्हीकल्सपैकी एक आहे. अपडेटेड Hyundai Venue ला पेट्रोल किंवा डिझेल इंजिन सोबत आणले गेले आहे. ज्याला गियरबॉक्स ऑप्शन सोबत जोडले आहे. Hyundai Venue ची किंमत ७.७२ लाख रुपयांपासून सुरू होते.
Hyundai i20: सनरूफ आणि किंमत
Hyundai i20 देशात सर्वात चांगली दिसणारी हॅचबॅक पैकी एक आहे. सनरूफ लावण्यात आल्याने ही कार आणखी आकर्षक दिसते. i20 नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज्ड मध्ये उपलब्ध आहे. Hyundai i20 ची एक्स शोरूम किंमत ७.१९ लाख रुपयांपासून सुरू होते.
Kia Sonet
सनरूफसाटी तुमच्यासाठी Kia Sonet चा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. वेन्यू प्रमाणे सॉनेट एकाच प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. वेन्यू प्रमाणे इंजिन आणि ट्रान्समिशन ऑप्शन सुद्धा मिळते. किआने सॉनेटला इंजिन आणि गियरबॉक्स ऑप्शन सोबत बदलले आहे. किआ सॉनेटची एक्स शोरूम किंमत ७.७९ लाख रुपयांपासून सुरू होते. या गाड्यात तुम्हाला कमी किंमतीत सनरूफची मजा करण्याची संधी मिळते. याशिवाय, तुम्हाला या गाड्यात अनेक सारे फीचर्स आणि जबरदस्त परफॉर्मन्सचा एक्सपीरियन्स मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने