नवी दिल्ली : Budget SUVs In India: भारतात एसयूव्हीच्या विक्रीत मोठी मागणी पाहिली जात आहे. या कार खूपच पॉप्यूलर कार आहेत. जर तुम्हाला कोणतीही एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुम्ही बजेट मध्ये १० लाख रुपयांपर्यंत कार खरेदी करू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ८ एसयूव्ही संबंधी माहिती देत आहोत. या कारची किंमत १० लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. या ठिकाणी कोणकोणत्या कारची माहिती दिली आहे. सविस्तर जाणून घ्या.
१० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील खास ८ एसयूव्ही
१. Tata Punch किंमत ६ लाख रुपये ते ९.४ लाख रुपयांपर्यंत.२. Tata Nexon किंमत ७.८० लाख रुपये ते १४.३५ लाख रुपयांपर्यंत.
३. Maruti Brezza किंमत ८.१९ लाख रुपये ते १३.८८ लाख रुपयांपर्यंत.
४. Hyundai Venue किंमत ७.६८ लाख रुपये ते १३.११ लाख रुपयांपर्यंत.
५. Kia Sonet किंमत ७.६९ लाख रुपये ते १४.३९ लाख रुपयांपर्यंत.
६. Renault Kiger किंमत ६.५० लाख रुपये ते ११.२३ लाख रुपयांपर्यंत.
७. Nissan Magnite किंमत ५.९७ लाख रुपये ते १०.९४ लाख रुपयांपर्यंत.
८. Mahindra XUV300 किंमत ८.४१ लाख रुपये ते १४.०७ लाख रुपयांपर्यंत.
कारच्या या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. या सर्व ५ सीटर एसयूव्ही आहेत. टाटा पंच मायक्रो एसयूव्ही सेगमेंट पैकी एक आहे. तर बाकीच्या सर्व ४ मीटर एसयूव्ही सेगमेंट पैकी आहेत. पंच शिवाय, बाकीच्या सर्व एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटची किंमत १० लाख रुपयाच्या वर आहे. परंतु, सुरुवातीची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या सर्व कमीत कमी बेस व्हेरियंटच्या ऑन रोडची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.